प्रताप भोसले यांची सामाजिक बांधिलकी लक्षणीय; मान्यवरांचे कौतुकोद्गार

प्रताप भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वरवडे प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य वाटप

कणकवली : मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक प्रताप भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रताप भोसले यांनी शिवजयंती उत्सव, वाढदिवस अशा विविध माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी नक्कीच लक्षणीय असल्याचे प्रतिपादन यावेळी विविध मान्यवरांनी केले.

याप्रसंगी कान्हा मालंडकर, अचित कदम, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष उर्फ संतोष पुजारे, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, सोहेल खान, सिझर फर्नांडिस, काका कदम, मंदार मेस्त्री, धनंजय सावंत, लतिफ खान, अमोल घाडीगांवकर, सदा चव्हाण, शिवदास साधिये, रितेश बावकर, सलमान शेख, कुणाल प्रभुदेसाई, अभी देसाई, आयरिस फर्नांडिस आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!