कुडाळ/ प्रतिनिधी
कुडाळ शहरातील १४ अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोफत छत्री वाटप शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने देण्यात आले.
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने शहरांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यामध्ये अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना छत्रीची आवश्यकता पाहता शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने शहरातील १४ अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभिषेक गावडे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, आफरीन करोल, श्रेया गवंडे, माजी सरपंच प्रशांत राणे, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, प्रथमेश केळबाईकर, राजाराम गडेकर, हमीद शेख, राजू गवंडे, राकेश नेमळेकर, राजन जळवी, आनंद अणावकर, समीर जळवी, चेतन पडते, योगेश काळप, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, राजवीर पाटील, शुवम महाडेश्वर आदी उपस्थित होते. अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप केल्याबद्दल अंगणवाडीतील शिक्षकांनी आभार व्यक्त केले.


Subscribe









