शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद! जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या तक्रारीनंतर मोठा निर्णय

शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वाचा आदेश जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने काढला आहे.
जि.प. सदस्य मा. श्री रुपेश अशोक पावसकर, नेरुर देऊळवाडा यांनी शासकीय व खासगी शाळांमधून होणाऱ्या बेकायदेशीर विक्रीबाबत तक्रार केली होती. त्यांच्या पत्राची दखल घेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जा.क्र. सिजिप/शिक्षण/माध्य/आस्था-2/1382/2026 दि. 21/07/2026

रोजी या संदर्भाने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना पत्र काढले आहे.शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांना व पालकांना एकाच दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही.
शाळेच्या आवारात वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरीची विक्री करण्यास पूर्णतः मनाई.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई होणार.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पालकांना या धाडसी निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. या धाडसी निर्णयामुळे नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांचे जिल्हाभरातील पालकांनी कौतुक केले आहे.

error: Content is protected !!