कुडाळ : सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी शिक्षण मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रसाद जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी धरली. यासाठी त्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत उपोषण केले होते. परंतु पोलीस बळाचा वापर करून शांततेत चालणारे उपोषण चिरडले गेले. ही घटना म्हणजे लोकशाहीची झालेली पायमल्ली असून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने सोमवारी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालय कुडाळ या ठिकाणी आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ काँग्रेसचे अभय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवाजीराव घोगळे आणि मनसेचे जगन्नाथ गावडे यांनी केले आहे.

कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने धरणे आंदोलन
1
/
109
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
1
/
109

Subscribe









