कागदापासून आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवण्याचे दिले प्रशिक्षण
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कागदापासून फुले व पुष्पगुच्छ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये अस्मिता परब मॅडम यांनी उपस्थित सर्व मुलांना कागदापासून पुष्पगुच्छ व फुले बनविण्याचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, माजी अध्यक्ष रो. आनंद वेंगुर्लेकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक भाटीवडेकर सर, विलास राठोड सर, रामदास गावडे सर, स्वरूप यादव सर, तायशेटे मॅडम, वारंग मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये पुष्पगुच्छ व फुले बनविण्याचे शिकून घेऊन मुलांनी आपल्या कलागुणांमध्ये वाढ करावी आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवून भविष्यामध्ये अर्थार्जनाची सोय करता येईल असं मार्गदर्शन अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी मुलांना केले.