जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून जिल्हयातील 35 सर्पमित्रांचा सत्कार सोहळा कौतुकास्पद – शेखर सामंत

कुडाळ येथे हाॅटेल स्पाईस कोकण मध्ये कुडाळ रोटरीचा अनोखा उपक्रम

कुडाळ : जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सिंधुदुर्ग जिल्हयातील 35 सर्पमित्रांचा जाहिर सत्कार सोहळा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार दै तरूण भारतचे जिल्हा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत यांनी व्यक्त केले.कुडाळ येथील हाॅटेल स्पाईस कोकण येथे जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित अनोख्या उपक्रमात जिल्हयातील सर्पमित्रांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक,सचिव राकेश म्हाडदळकर,खजिनदार डाॅ जयश्री केसरे,राजन बोभाटे ,शशिकांत चव्हाण,प्रमोद भोगटे, गजानन कांदळगावकर ,रवींद्र परब, नीता गोवेकर ,आनंद वेंगुर्लेकर ,राजीव पवार , रुपेश तेली,रोहन देसाई, सर्प मित्र आणि महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये मानद सदस्य भाग्यश्री परब ,सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमचे मायकेल डिसोजा उपस्थित होते.

ज्येष्ठ सर्पमित्र व विज्ञान अभ्यासक विजय शिंत्रे विशेष सन्मान

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे 1987 पासून कार्यरत असणारे प्रसिध्द सर्पमित्र तथा विज्ञान अभ्यासक विजय शिंत्रे यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान शेखर सामंत यांचेहस्ते करण्यात आला.


जागतिक सर्पमित्र दिनानिमित्त 35 सर्पमित्रांचा सन्मान

सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक वर्षे सर्पमित्र म्हणून कार्यरत असलेल्या 35 सर्पमित्रांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून सन्मान करण्यात आला. यामध्ये विष्णु मस्के,ओमकार लाड,तेजस वराडकर,संदीप चिऊलकर,मंदार गावडे,रामचंद्र खाकर,डाॅ.प्रसाद धुमक,दिपक दुतोंडकर,श्रीकृष्ण कदम,सिद्धेश ठाकूर,दर्शन वेंगुर्लेकर,भाग्यश्री परब,तेजस नार्वेकर
,ऊल्हास कोरगांवकर,स्वप्निल परुळेकर,अनिल गावडे,डॉक्टर राणे,वैभव अमृस्कर,प्रसाद गावडे,दिवाकर बांबार्डेकर,धनंजय मेस्त्री
उदय परब,प्रविण पवार,पंकज घाडी,प्रशांत जाधव,बाबुराव कांबळे,संकेत काणेकर ,विष्णु मसगे,श्रीकृष्ण कदम ,सिद्धेश,ठाकुर ,प्रसन्न गंगावणे, हरेश वारंग,देविदास चव्हाण,डाॅ सुधीर राणे,प्रसन्न गंगावणे,अनिल गावडे,प्रसाद गावडे,हरेश वारंग,संकेत काणेकर ,बाबुराव कांबळे,प्रज्ञा खोत,भाग्यश्री परब ,आदींचा सन्मान करण्यात आला.

सापांबाबत जनजागृती आवश्यकविजय शिँत्रे

नुसते साप पकडून सोडून देण्यापेक्षा त्या सापांविषयी अभ्यास करा लोकांना सापांच्या प्रजाती त्यांचे उपयोग त्यांचे फायदे पटवून सांगा वैज्ञानिक दृष्टिकोनात सर्पमित्रव्हा आणि सापांबाबत समाजामध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रसिध्द सर्पमित्र विजय शिँत्रे यांनी व्यक्त केले.

साप हे निसर्गाच्या जीवन चक्रातील एक अविभाज्य घटक मकरंद नाईक

लोक भीतीपोटी किंवा अंधश्रद्धेपोटी सदर सापांना बऱ्याच वेळा मारतात परंतु सर्पमित्रांनी लोकांमध्ये जनजागृती केल्यामुळे लोक त्यांना बोलवून त्या सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत आहेत सर्पमित्र कधीही किती वाजता लोकांचा कॉल आल्यानंतर कशाचीही परवा न करता मानधन किंवा आपला जीव याची पर्वा न करता लोकांपर्यंत पोहचता त्या सापला रेस्क्यू करता आणि हे निसर्गा चक्र सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करता म्हणून तुम्हा लोकांचे कौतुक करण्यासाठी हा सन्मान सोहळा ठेवला असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी व्यक्त केले.

जीवावर उधार होऊन तुम्ही लोकांन साठी काम करता तुम्हाला हवी तशी प्रसिद्धी किंवा मानधन मिळत नाही -शेखर सामंत

जीवावर उधार होऊन तुम्ही लोकांन साठी काम करता तुम्हाला हवी तशी प्रसिद्धी किंवा मानधन मिळत नाही सामंतआपण पत्रकार म्हणून पाठपुरावा नक्कीच करू विशेष म्हणजे तुम्हा लोकांचा सत्कार करणे मानसन्मान करणे तुम्हा लोकांना एका छताखाली एकत्र आणणे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हा सर्व सर्पमित्रांना एकत्र आणण्याचे काम रोटरी आणि त्याचे अध्यक्ष श्री मकरंद नाईक यांनी केले त्यांचे विशेष कौतुक असल्याचे शेखर सामंत यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डाॅ जयश्री केसरे तर आभार राकेश म्हाडदळकर यांनी केले.

error: Content is protected !!