२ वर्षांपासून बंद असले नेरूर उपकेंद्र लवकरच सुरू होणार
कुडाळ : नेरूर देऊळवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण होऊन २ वर्षे झाली तरीही ती सेवेअभावी बंद होती. याकडे सातत्याने पाठपुरावा करत जिल्हा परिषद सदस्य श्री. रूपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
नेरूर उपकेंद्राची इमारत तयार असूनही सुरू न झाल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न गांभीर्याने घेत श्री. पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत हा मुद्दा लावून धरला. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपकेंद्राबत सविस्तर चर्चा केली.पावसकर यांच्या पाठपुराव्यानंतर CEO व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नेरूर उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. इमारत पूर्णपणे सुसज्ज असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने उपकेंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.याचबरोबर उपकेंद्रापर्यंत जाणारा रस्ता २३ नंबरला नोंद करून घेण्याचे आदेश ग्रामसेवक व सरपंच यांना देण्यात आले.उपकेंद्र सुरू झाल्याने नेरूरसह पंचक्रोशीतील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा गावातच मिळणार आहेत. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पावसकर यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.


Subscribe










