श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना इनर व्हील क्लब, कुडाळतर्फे शालेय गणवेशांचे वाटप

कुडाळ : सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत इनर व्हील क्लब, कुडाळ यांच्या वतीने श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेट देण्यात आले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनी स्वागत केले.

यावेळी इनर व्हील क्लब, कुडाळच्या अध्यक्षा श्रीमती प्राप्ती तेली, पीडीसी डॉ. सायली प्रभू तसेच क्लबच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने सहाय्यक शिक्षिका उर्मिला गवस यांनी उपस्थित राहून इनर व्हील क्लबच्या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई तसेच श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाच्या वतीने इनर व्हील क्लब, कुडाळचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. समाजातील स्वयंसेवी संस्थांनी शिक्षण क्षेत्रासाठी अशा प्रकारे सहकार्याचा हात पुढे केल्यास गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या उपक्रमासाठी रश्मी नाईक यांनी विशेष पुढाकार घेतला.

error: Content is protected !!