११ वर्षांच्या लेकीने दिला आईच्या चितेला अग्नी

कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील घटनेने सर्वांचे डोळे पाणावले

३-४ वर्षांपासून आजारी असलेल्या आईची केली सेवा

कणकवली : लेकीने आपल्या आईच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे धाडस कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथिल ११ वर्षांची चिमुरडी तन्वी संदीप चव्हाण हिने दाखविले. तिने आपल्या आईच्या चितेला अग्नी देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत मुलांप्रमाणेच मुलींनेही आपले कर्तव्या बजावल्याने तिच्या धाडसाला सलाम होत आहे.

मागील ३-४ वर्षांपासून तन्वीची आई सौ. प्रियांका ही आजारी होती. अशावेळी ती आईला हिंमत देत आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होती. वडील संदीप चव्हाण हे तळेरे येथे काम करून संसाराचा गाडा हाकतात. यामुळे घरात तन्वीचा मोठा आधार आईला होता. तन्वी ही तळेरेतील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात इ.५ वीच्या वर्गात शिकत आहे. तिचे वय हे खेळायचे व अभ्यास करायचे असताना ती या वयात आईची सावली बनून सेवा करत होती.

जेवण बनवणे, घरचे आवरून शाळेत जाणे ही नेहमीची कामे करताना ती अभ्यासही प्रामाणिकपणे करायची. सोमवारी तिच्या आईचे निधन झाले. आजारपणात तन्वी हिने केलेली आईची सेवा व तिचा आईशी असलेला लळा विचारात घेऊन आईला अग्नी देण्याचा मान कुटुंबीयांनी तन्वी हिला दिला.

error: Content is protected !!