ग्रामपंचायत मधील विकासकामांचा घेतला आढावा!
कुडाळ : हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो परंतु प्रत्यक्षात आज या ग्रामपंचायतीचे कामगाज पाहीले आणि समाधान वाटले असे गौरवोद्गार जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांनी काढले
श्री कामत आणि श्री साईल यांनी आज हुमरमळा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली यावेळी पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे आणि सरपंच श्री अमृत देसाई यांनी गुलाब रोपे देऊन सन्मानित करण्यात आले
ग्रामपंचायतीचे कामगाज समाधान कारक
हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या कामांचे कौतुक ऐकुन होतो परंतु आज प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला भेट देण्याचा योग आला ग्रामपंचायत इमारत आणि विकासकामांचा आढावा घेता या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे असे गौरवोद्गार श्री कामत यांनी काढले
शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना प्राधान्य द्या – दादा साईल
या ग्रामपंचायतीचे काम समाधानकारक आहे तसेच शेतक-यांसाठी जिल्हा परिषदेकडे योजना आहेत त्यासाठी शेतक-यांना योजनांचा फायदा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना श्री दादा साईल यांनी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांना दिल्या
यावेळी ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री दादा साईल यांचे विशेष आभार मानले


Subscribe









