कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाई
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने आज एका धडक कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गोटात खळबळ उडाली आहे. कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील आणि नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली. तालुक्यात अनधिकृतपणे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली. कारवाई दरम्यान पथकाने खालील दोन डंपर रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहेत.
1. डंपर क्रमांक: GA 03 K 8369 मालक शुभम राऊळ
2. डंपर क्रमांक: GA 03 V 2880 गाडी मालक राहुल ठाकूर असल्याचे डंपर चालकांनी सांगितले आहे.प्रशासनाने दोन्ही डंपर जप्त केले असून, पुढील कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. तालुक्यातील कोणत्याही भागात अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला असून यापुढेही अशी धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


Subscribe









