ओसरगाव टोल नाका सुरू होणे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर

तांत्रिक अडचणी ठरल्या कारण

​सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली आणि कसाल सीमेवर ओसरगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरून होणारी टोलवसुली तूर्तास लांबणीवर पडली आहे. हा टोल नाका उद्यापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो उद्या सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
​काही तांत्रिक अडचणी तसेच आवश्यक ती अत्यावश्यक यंत्रसामग्री व साहित्य वेळेत उपलब्ध न झाल्याने ओसरगाव टोल नाका अनिश्चित कालावधीसाठी बंदच राहणार असल्याची माहिती टोल एक्सपर्ट देवेन आपटे यांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तूर्तास टोलपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील आदेश येईपर्यंत टोलवसुली सुरू होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!