आकाशवाणीवर प्रा. सिद्धेश नेरुरकर यांची ‘सुलेखन ते ब्रँड डिझाइन’ विषयावर मुलाखत

सावंतवाडी : अक्षररचना, सुलेखन, टायपोग्राफी आणि ब्रँड डिझाइन या विषयांवर कार्यरत असलेले प्रा. सिद्धेश नेरुरकर यांची विशेष मुलाखत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरीवरून प्रसारित होणार आहे. ‘सुलेखन ते ब्रँड डिझाइन — अक्षरांची नवी वाटचाल’ या विषयावर आधारित या मुलाखतीत अक्षरांचे बदलते स्वरूप, टायपोग्राफी व कॅलिग्राफीचे महत्त्व तसेच ब्रँडची दृश्य ओळख निर्माण करण्यात अक्षरांची भूमिका याविषयी संवाद साधण्यात आला आहे.

प्रा. सिद्धेश नेरुरकर हे गेल्या १७ वर्षांपासून बी. एस. बांदेकर उपयोजित कला महाविद्यालय, सावंतवाडी येथे अक्षररचना, सुलेखन आणि कम्युनिकेशन डिझाइन या विषयांचे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. टायपोग्राफी आणि कॅलिग्राफीच्या माध्यमातून अक्षरांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असून, या क्षेत्रातील त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

ही मुलाखत सोमवार, दि. १७ ऑगस्ट आणि मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आकाशवाणी सिंधुदुर्गनगरीच्या FM 103.6 MHz या केंद्रावरून प्रसारित होणार आहे. तसेच प्रसार भारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि NewsOnAir वरही ती ऐकता येणार आहे.

या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सुनील गायकवाड असून संवादिका म्हणून संजीवनी पालयेकर यांनी संवाद साधला आहे. अक्षर, कला आणि ब्रँड डिझाइनच्या बदलत्या प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत रसिकांनी आवर्जून ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!