आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर.

कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा शब्द सभागृहात दिला होता. त्यानुसार कार्यवाही करत १२ तासांच्या आत शासन निर्णय जाहीर करत प्रती हेक्टरी २२,५०० प्रमाणे मदत जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ४२३२२ शेतकऱयांना एकूण ७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे, यात कुडाळ तालुक्यातील ७७५१ शेतकऱ्यांना १२ कोटी ५७ लाख तर मालवण तालुक्यातील ७४२९ शेतकऱ्यांना ११ कोटी २२ लक्ष एवढी नुकसानभरपाई मिळनार आहे, त्या व्यतिरिक्त विमा कंपन्यांनाकडून नुकसानभरपाई मिळणे बाकी असून आमदार निलेश राणे त्याचा पाठपुरावा करत आहेत,

आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर कोकणातील शेतकऱ्यांची समस्या मांडत अवघ्या काही तासात शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पडणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. २०१३ नंतरची अश्या प्रकारची ही पहिलीच नुकसानभरपाई आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली असून खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा व प्रयत्न यशस्वी ठरले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

error: Content is protected !!