कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना खाऊ देत त्यांच्या सोबत वेळ घालवला. तसेच वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.
आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच समाजपयोगी कार्यक्रम चालू ठेवणार असल्याचे यावेळी युवसैनिकांनी सांगितले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, मुन्ना दळवी, तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडुलकर, अवधूत सामंत, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, बाळा सावंत, सचिव साई दळवी, कडावल ग्रामपंचायत सदस्य समीर परब, भूषण गावडे विनोद सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते