कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कडावल गावातील सुनंदा श्यामसुंदर कालेकर यांना घरासाठी लागणारे सर्व पत्रे व गृहपयोगी धान्य व सामान रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्त केली.
या निराधार वृद्ध महिलेच्या घरी काही दिवसापूर्वी शॉर्ट सर्किटने आग लागली. यामुळे तिच्या घराचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन युवा सेना कुडाळच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तात्काळ पावसाची संभावना ओळखून घरासाठी लागणारे सर्व पत्रे व गृहपयोगी धान्य व सामान रोख स्वरूपात आर्थिक मदत सुपूर्त केली. तसेच पुढेही कोणती अडचण असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत हा विश्वास दिला.
आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच समाजपयोगी कार्यक्रम चालू ठेवणार असल्याचे यावेळी युवसैनिकांनी सांगितले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, मुन्ना दळवी, तालुकाप्रमुख सागर वालावलकर, अनिकेत तेंडुलकर, अवधूत सामंत, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, बाळा सावंत, सचिव साई दळवी, कडावल ग्रामपंचायत सदस्य समीर परब, भूषण गावडे विनोद सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते


Subscribe










