नगरसेवक अभिषेक गावडे व नगरसेवक राजीव कुडाळकर यांच्याकडून तातडीची आर्थिक मदत
कुडाळ प्रतिनिधी
शहरातील वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक असलेल्या महेश सामंत यांच्या बिल्डिंग मधील भाडेकरू प्रसाद नाईक यांच्या खोलीमध्ये आग लागली ही आग एवढी भयानक होती ती त्या ठिकाणी जाणे कठीण होते एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने जीव धोक्यात घालून ही आग विझवण्यात यश मिळवले मात्र प्रसाद नाईक यांच्या खोलीतील सर्व वस्तू राख झाल्या.
वाघ सावंत टेंब येथील भवानी मंदिर नजीक महेश सामंत यांची बिल्डींग आहे या बिल्डिंगमध्ये गॅरेज व्यावसायिक प्रसाद नाईक हे भाडे करू म्हणून आहेत संध्याकाळी त्यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या दरम्यान या खोलीमधून धूर येत असल्याचे राजू सावंत यांना दिसले त्यांनी पाहणी केली असता या खोलीमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले तात्काळ स्थानिक नागरिकांनी दरवाजा उघडून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले पण आगीचे लोळ एवढे होते की त्या ठिकाणी जाणे सुद्धा कठीण होते दरम्यान एमआयडीसी अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले या दलातील प्रमुख प्रमोद परब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय डिचवलकर, अनिल गोसावी, ऋषिकेश पिकुळकर, अनिकेत तोडणकर, मंदार पराडकर, स्वप्निल गुडेकर, सचिन पोटे या अग्निशमन विमोचकानी आगीवर नियंत्रण मिळवले या खोलीमध्ये दोन गॅस सिलेंडर होते हे गॅस सिलेंडर या पथकाने बाहेर काढले त्यानंतर विजवली. तसेच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशामक दल सुद्धा घटनास्थळी दाखल झाला होता. यामध्ये स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवता आले पण त्यांच्या घरातील एकही वस्तू राहिली नाही. ही घटना समजतात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर, स्थानीक नगरसेवक राजीव कुडाळकर, शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर घटनास्थळी दाखल झाले.
नाईक कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत
ही घटना समजतात शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या कुटुंबीयांना तात्काळ १० हजार रुपयांची मदत राजू सावंत यांच्याकडे सुपूर्त केली. तसेच स्थानिक नगरसेवक राजीव कुडाळकर यांनी ५ हजार रुपयांची मदत केली




Subscribe









