सिंधुदुर्गनगरी : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उपलब्ध आहेत. तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्र न जोडलेले अर्ज, किंवा सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार, निवेदने वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही श्री. शिणगारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Subscribe









