ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धा – डान्सिंग सुपरस्टार २०२६

कोकण लय भारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ आयोजित सर्वात मोठी डान्स स्पर्धा

कुडाळ : कोकण लय भारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं टीम कुडाळ आयोजित सर्वात मोठी डान्स स्पर्धा डान्सिंग सुपरस्टार २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमित्त देशभरातील अनेक कलाकार कुडाळ शहरात येणार असून या स्पर्धेच्या फायनल राउंडसाठी सेलिब्रिटी परीक्षक म्हणून फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तथा लावणी किंग श्री आशिष पाटील उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला ₹ 50 हजारांचे, उपविजेत्या स्पर्धकाला ₹ 25 हजारांचे पारितोषिक मिळणार आहे. या स्पर्धेचे ऑडिशन रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. या ऑडिशनमध्ये स्पर्धकाची निवड न झाल्यास ऑडिशन साठी भरलेली फी स्पर्धकाला परत केली जाणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सर्वांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन चिमणी पाखरं डान्स अकॅडमी चे संचालक रवी कुडाळकर यांनी केले आहे.

संपर्क

रवी कुडाळकर : 9503554099 / 9422374435

error: Content is protected !!