शासकीय वैद्यकीय “रुग्णालय” की जनावरांचा “गोठा”?

बाह्यरुग्ण इमारतीच्या दरवाजासमोर “घाणीचं साम्राज्य”! तर दोनच महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हिल चेअर्सच्या घेतायत अखेरचा श्वास .!

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय रुग्णालय व्यवस्थापनाची “निष्क्रियता पुन्हा एकदा अधोरेखित..!

वैद्यकीय कॉलेज रुग्णालयास निष्क्रियतेचा सर्वोच्च सन्मान द्यावा

प्रसाद गावडे यांची उपहासात्मक मागणी

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व्यवस्थापन व डीनची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली असून रुग्णालयात रुग्ण येऊच नयेत आणी आलेच तर कंटाळून पून्हा येण्याचं धैर्य होणार नाहीं यासाठीचे पद्धतशीर नियोजन केलेले दिसून येत आहे. डीन कार्यालय इमारतीच्या दरवाजा समोरच ड्रेनेज फुटल्याने घाणीचं सामाज्य झालेले असून अस्वच्छतेमुळे येणाऱ्या रुग्णांना दुर्गंधी सोबतच डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुग्णालयाच्या एन्ट्रीलाच ठेकेदाराने गेट शेजारीच काँक्रीट प्लांट उभारल्याने हवेत झालेल्या धुळीच्या प्रादुर्भावाने नागरिकांसहित कर्मचाऱ्यांना देखील श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वैद्यकीय रुग्णालय आरोग्यसेवा देणारी “संस्था” आहे की जनावरांचा “गोठा” अशी भावना नागरिकांची झालेली आहे.याशिवाय बाहयरुग्ण सेवेसाठी तज्ञ डॉक्टर भेटीची वेळ सकाळी आठ वाजल्यापासूनची असताना देखील दहा ते साडे दहा पर्यंत डॉक्टर्स ओपीडी चेंबर्सना उपस्थित राहत नसल्याच्या नागरिकांच्या प्रचंड तक्रारी प्राप्त आहेत. आवश्यकता असलेल्या रुग्णांना व्हीलचेअर्स उपलब्ध होत नसून दोनच महिन्यांपूर्वी खरेदी केलेले व्हील चेअर्स मोडकळीस आल्याने अखेरचा श्वास घेत आहेत. त्यामुळे व्हील चेअर्स खरेदी प्रक्रिया व त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे.एकूणच रुग्णालयात रुग्णसेवेचा बट्ट्याबोळ झालेला असून रुग्णालय व्यवस्थापन सहित डीनची निष्क्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय कॉलेज रुग्णालयास निष्क्रियतेचा सर्वोच्च सन्मान देऊन जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कुचकामी केल्याबद्दल अभिनंदन करण्याची उपहासात्मक मागणी शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी केली आहे. जिल्ह्याची जनता मेडिकल कॉलेज रुग्णालय नको आम्हाला आमचे जुने जिल्हा ग्रामीण रुग्णालय परत द्या अशी जनतेची भावना झालेली असल्याचे गावडेंनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!