शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ शहरातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी जाहीर करण्यात आल्या.त्यामध्ये युवासेना उपशहरप्रमुख पदी विनय पालकर तसेच युवासेना शहर सचिवपदी रोहन शिरसाट यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख ,नगरसेवक मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे,गुरु गडकर, शैलेश काळप, कृष्णा तेली तसेच शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.