सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आर्या नागवेकर हिच्या कलाकृतीची PMVision2Art या प्रतिष्ठित उपक्रमासाठी निवड झाली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात देशभरातून आलेल्या ३००० उत्कृष्ट कलाकृतींपैकी ७५ विजेत्यांमध्ये आर्याचा समावेश झाला आहे.
‘विकसित भारत’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे देशाच्या प्रगतीविषयी जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या यशस्वी निवडीमुळे आर्या नागवेकर हिला पुरस्कार वितरण समारंभासाठी मुंबई येथे आमंत्रित करण्यात आले आहे. हा समारंभ सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार असून, मान्यवर पाहुणे व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत आर्याचा सन्मान करण्यात येणार आहे.
आर्या नागवेकर हिच्या या उल्लेखनीय यशामुळे बांदेकर कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण महाविद्यालयात अभिमानाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले, संस्थाध्यक्ष रमेश भाट, वर्गशिक्षक प्रा. सिद्धेश नेरुरकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बी एस बांदेकर कॉलेजच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय पातळीवर निवड
1
/
108
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
1
/
108

Subscribe










