नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए ट्रान्सफॉर्मर मंजुर

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन मधून १० लाख निधी मंजुर

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी मानले आभार

मालवण : मालवण तालुक्यातील नांदरुख कुर्लेभाटले येथे 63 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर (निधी 10लाख) जिल्हा नियोजन मधून प्रस्तावित करण्यात आला.

नांदरुख कुर्लेभाटले येथे ट्रान्सफॉर्मर बसविल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन मधून हे काम मंजूर आहे. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे शिवसेना शाखाप्रमुख समीर पाटकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!