डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा – पंढरी चव्हाण

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कुडाळ : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना आपल्या आयुष्यात प्रत्येकाने माणूस म्हणून जगा समाजाच्या सर्वागीण विकासासाठी काम करा असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी पावशी येथे केले.
    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरयांची 135 वी जयंती भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई जिल्हा अध्यक्ष बाबल पावसकर यांच्या पावशी येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली  डॉ  आंबेडकर यांच्या प्रतिमेला  पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबल पावसकर  राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण अरुण होडावडेकर जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव रघुनाथ चव्हाण मनीष पावसकर
मंगेश चव्हाण,गुरू मूळदेकर सहदेव चव्हाण भारत पेंडुरकर नांदगाव तंटा मुक्ती अध्यक्ष राजू तांबे सुरेश हरकुळकर
वेंगुर्ला तालुका अध्यक्ष – कांता चव्हाण अँड भूषण कदम आत्माराम पावसकर विल्सन डिसोजा अन्नपूर्णा पावसकर मंगेश पावसकर बाळकृष्ण पावसकर नंदकिशोर तेंडोलकर लक्ष्मी तेंडोलकर  इंद्रजीत चव्हाण अंकुश चव्हाण समाजबांधव उपस्थित होते
   यावेळी बोलताना राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण म्हणाले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना करताना सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आज त्यांच्यामुळेच आपला समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गरजापासून ते मानवी अधिकारापासून दूर असणाऱ्या व्यक्ती समूह व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे त्यांचे हे कार्य अधिक बलवान  होणे काळाची गरज आहे लोकशाही केवळ यंत्रणेचा भाग नसून लोकशाहीचे सामाजिककरण झाले पाहिजे असा त्यांचा विचार होता कारण लोकशाही हा जीवन मार्ग आहे असे त्यांचे मत होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका व्यक्तीसाठी अगर समाजासाठी नव्हते तर ते देशातील सर्व वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या बाजूचे होते. मानवी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात तो एक भाग होता म्हणून आपण त्यांना मानवी मुक्तीचे नेते म्हणून ओळखतो
जिल्हा अध्यक्ष बाबल पावसकर यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत त्याच्यामुळे आमची ओळख आहे असे सागून त्यांना अभिवादन केले जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन समाजात समाज प्रबोधन केले पाहिजे वाडीवाडीत त्यांच्या जयंती साजऱ्या केल्या पाहिजेत. विविध उपक्रम राबविले पाहिजेत असे सांगितले सूत्रसंचालन भारत पेंडुरकर यांनी केले उपस्थित श्री होडावडेकर रघुनाथ चव्हाण राजू तांबे अँड कदम अंकुश चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले पावशी नंतर कुडाळ आंबेडकर नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघटनेच्या वतीने पुष्पहार घालण्यात आला
पावशी
भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालताना राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण जिल्हा अध्यक्ष बाबल पावस्कर अरुण होडावडेकर संतोष जाधव प्राजक्त चव्हाण व मान्यवर

error: Content is protected !!