हरकुळ बुद्रुक मतदार संघात ज्येष्ठ नागरिकांसाठी भेटवस्तू वाटप

गणेश याग संपन्न

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

कणकवली : केंद्रीय माजी मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंच्या १० एप्रिलच्या ७४ व्या वाढदिवसाचे तथा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्यात आला. तसेच शृंगेश्वर मंदिरात गणेश याग संपन्न झाला.
आज सकाळी हरकुळ खुर्द येथील शृंगेश्वर गणेश मंदिरामध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरकुळ बुद्रुक मतदार संघातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि पुरुषांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित असलेल्या ज्येष्ठ महिलांसाठी साडी आणि जेष्ठ पुरुष नागरिकांसाठी भेटवस्तू वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज रावराणे, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर , हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी, शक्ती प्रमुख राजा डिचवलकर , तालुका भाजप कार्यकारणी सदस्य श्री. सरवणकर, करूळ सरपंच सौ. नर, कोडये सरपंच, गणेश मंदिर ट्रस्टचे विश्वस्त समीर सावंत आणि श्रीकांत दळवी तसेच हरकुळ बुद्रुक मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!