जिल्ह्यातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने “राधाकृष्ण चषक २०२६” या सांगितिक महोत्सवाअंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा(हिंदुस्थानी ख्याल)’ व ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ चे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा शनिवार दि. २५ एप्रिल व रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी आजगांव येथील श्री देव वेतोबा मंदिर सभागृहात संपन्न होणार आहे. स्पर्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातील स्पर्धकासाठी मर्यादित आहे. तळकोकणातील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे व त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेल्या सात वर्षांच्या यशस्वी आयोजननंतर स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शास्त्रीय संगीत स्पर्धा ‘खुल्या गटा’त तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा ‘छोटा गट’ व ‘मोठा गट’ अश्या दोन गटात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके व सन्मानचिन्हे ठेवण्यात आली असून सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मा. परिक्षक महोदयांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री. हेमंत दळवी ९४२३५८५७९२ / सौ. वीणा दळवी ९४२३८१९०९२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ, आजगांव’ यांच्या सहकार्याने “राधाकृष्ण चषक २०२६” चे आयोजन
1
/
107
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
1
/
107

Subscribe










