स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून काम करत असलेल्या सर्वांचा रायगडाच्या पावन भूमीत सन्मान
रायगड : ०३ एप्रिल २०२६ रोजी रायगड येथील फाऊंटन IN हाॅटेलमध्ये आई फाउंडेशन आणि पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे “रायगड” गौरव🎖️ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्यदिव्य सोहळ्यात “संकल्प शिवप्रतिष्ठान” या संस्थेला सुद्धा छत्रपती शिवराय समाज भूषण पुरस्कार🏆 प्रदान करण्यात आला. रायगड येथे पार पडलेल्या या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री मा.श्री. भरतशेठ गोगावले साहेब, अभिनेते श्री.संतोष पाटिल तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
संकल्प शिवप्रतिष्ठान करत असलेल्या कार्याबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल एक कौतुकाची थाप किंवा शाबासकी म्हणून… हा बहूमुल्य सन्मान प्रदान करण्यात आला . या सोहळ्यात मांडकुली तसेच इतर गावांतील तसेच संकल्प शिवप्रतिष्ठान चे सर्व शिलेदार उपस्थित राहिले होते. रायगड जिल्ह्यासारख्या पवित्र भूमित निमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल सत्कारमूर्तींनी आयोजकांचे आभार मानले.