हुमरमळा (वालावल) तलाठी पुजा भोरे कायमस्वरूपी हजर!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात उत्कृष्ट कामगिरी!

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा शाल श्रीफळ देऊन केला सन्मान


कुडाळ : हुमरमळा (वालावल) गावातील तलाठी पुजा भोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आज पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत इमारत पुर्ण झाल्याने तलाठी कार्यालय याच इमारतीमध्ये सुरू सोमवार पासुन करण्यात आले.
यापुर्वी तलाठी सजा स्वतंत्र हुमरमळा होऊन सुद्धा जागे अभावी तलाठी पाट येथुन हुमरमळा वालावल सजा चा कार्यभार सांभाळला जात होता.

सोमवारी तलाठी पुजा भोरे हजर झाल्या असुन तलाठी कु भोरे यांनी अभियान काळात उत्पन्न दाखले, वारस नोंदी,संजय गांधी निराधार योजना अशा विविध कामांना गती देण्याचे काम तलाठी भोरे यांनी केल्याने आज पंचायत समिती सदस्या सौ अर्चना अतुल बंगे यांच्या हस्ते भोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तलाठी कार्यालयाला सौ बंगे यांनी दस्तऐवज रेकॉर्ड ठेवण्यासाठी कपाट भेट देऊन हुमरमळा वालावल गावातील लोकांसाठी कायम स्वरूपी तलाठी यांनी सेवा द्यावी असे सौ बंगे यांनी सांगितले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, ग्रामअधिकारी श्रीम अपर्णा पाटील, हुमरमळा वालावल ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश मयेकर, आदी उपस्थित होते

error: Content is protected !!