विविध क्रीडास्पर्धांची मांदियाळी
सिंधुदुर्ग : माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित या स्पर्धा जिल्हाभरातील विविध तालुक्यांमध्ये पार पडणार असून, यामध्ये खेळाडूंना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवांतर्गत होणाऱ्या प्रमुख स्पर्धांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. बॅडमिंटन स्पर्धा (कणकवली)
तारीख: ४ एप्रिल २०२६
ठिकाण: नगरपंचायत हॉल, कणकवली.
गट: १२ वर्षांखालील, महिला खुला गट, ४० वर्षांवरील आणि पुरुष (एकेरी व दुहेरी).
बक्षीस: प्रथम ५,००० ते १०,००० रुपये आणि द्वितीय ३,००० ते ६,००० रुपयांपर्यंत रोख रक्कम व ट्रॉफी.
२. कुस्ती स्पर्धा (वैभववाडी)
तारीख: १० एप्रिल २०२६ (सायंकाळी ५ वाजल्यापासून)
ठिकाण: दुर्गामाता मैदान, वैभववाडी.
वैशिष्ट्य: या स्पर्धेसाठी कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
३. मॅरेथॉन स्पर्धा (देवगड)
प्रमुख: संदीप साटम आणि राजा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड तालुक्यात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी खेळाडूंना टी-शर्ट आणि मेडल दिले जाणार आहेत.
४. बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धा (कुडाळ)
तारीख: १० एप्रिल २०२६ (सकाळी ८:३० ते सायंकाळी ६:३०)
ठिकाण: गुलमोहर महालक्ष्मी हॉल, कुडाळ.
बक्षीस: बुद्धिबळ स्पर्धेसाठी एकूण १५,००० रुपये आणि कॅरम स्पर्धेसाठी १८,५०० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
5 बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा (मालवण)
तारीख: १० आणि ११ एप्रिल २०२६.
ठिकाण: टोपीवाला हायस्कूल, मालवण.
बक्षीस: प्रथम २५,००० रुपये, द्वितीय १०,००० रुपये आणि तृतीय ५,००० रुपये. तसेच उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी आणि सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत.
6. टेबल टेनिस स्पर्धा (सावंतवाडी)
तारीख: १० एप्रिल २०२६.
ठिकाण: नगरपरिषद बॅडमिंटन हॉल, सावंतवाडी.
गट: १९ वर्षांखालील (मुले/मुली), पुरुष खुला गट, महिला खुला गट आणि दुहेरी खुला गट.
बक्षीस: प्रत्येक गटात प्रथम ५,००० रुपये आणि द्वितीय ३,००० रुपये याप्रमाणे बक्षिसे दिली जातील.
7. व्हॉलीबॉल आणि खो-खो स्पर्धा (वेंगुर्ला)
तारीख: १० ते १२ एप्रिल २०२६.
ठिकाण: कॅम्प मैदान, वेंगुर्ला.
बक्षीस: व्हॉलीबॉलसाठी प्रथम २०,००० रुपये, तर खो-खो स्पर्धेसाठी प्रथम १५,००० आणि द्वितीय ७,५०० रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
8. कबड्डी स्पर्धा (दोडामार्ग)
ठिकाण: जि.प. शाळा नं. १ क्रीडांगण, कसई दोडामार्ग.
बक्षीस: कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम १५,००० रुपये आणि द्वितीय १०,००० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय ‘बेस्ट रेडर’ आणि ‘बेस्ट डिफेन्डर’ यांनाही रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात येईल.
सहभागासाठी आवाहन:
या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना टी-शर्ट, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भाजप सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.


Subscribe










