श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळ यांचा संयुक्त कार्यक्रम
कुडाळ : प्रतिनिधी
हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि. १९ मार्च रोजी सायं. ३.३० वाजता नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली २० वर्ष कुडाळ शहरात या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष आहे. कुडाळचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे श्रीफळ ठेवून तसेच धर्मध्वजाचे पूजन करून या स्वागत यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर – पानबाजार – बाजारपेठ – मारूती मंदीर-गांधीचौक-राजमाता जिजाऊ चौक येथून पोस्ट ऑफिस चौक मार्गे श्री देवी केळबाई मंदीर येथे यात्रेची समाप्ती होईल.
या यात्रेत धर्मध्वज, भारत मातेची पालखी, लेझीम नृत्य व आई केळबाई मित्रमंडळाचे ढोलपथक असणार आहे. या यात्रेत श्री देव कुडाळेश्वर मंदिर – श्री देव महालक्ष्मी मंदीर-श्री देव भैरव मंदीर या ठिकाणाहून सर्व धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत. या स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे नियोजन बैठक पार पडली. तरी या स्वागत यात्रेत सर्व नागरिक बंधू-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी व्हावे व हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करावे असे आवाहन आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समितीचे संयोजक प्रख्यात काणेकर यांनी केले आहे.


Subscribe










