आता हंटर चालवावाच लागणार
प्रसाद गावडे यांचा व्हॉट्सॲप स्टेट्स चर्चेत
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून राजकारणातून अलिप्त असलेल्या प्रसाद गावडे यांचा व्हॉट्सॲप स्टेट्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर प्रसाद गावडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, राजकारण व समाजकारणात नेहमी सक्रीय असणारे प्रसाद गावडे राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. आज बऱ्याच दिवसांनी प्रसाद गावडे यांनी ठेवलेला व्हॉट्सॲप स्टेट्स चर्चेचा विषय ठरला आहे. या स्टेट्समध्ये आपल्याला हातात ‘हंटर’ घेतलेला फोटो पाहायला मिळत असून त्याखाली “हम थोडे शरीफ क्या हुए पुरी दुनिया ही बदमाश हो गई,” आता हंटर चालवावाच लागणार.. #संघर्षाला अंत नाही… शांत बसायला मी काही संत नाही..! असा मजकूर पहायला मिळत आहे.
प्रसाद गावडे हे प्रशासनाचे उत्तम अभ्यासक असून अन्यायाविरोधात ते नेहमी आवाज उठवत असतात. गावडे यांनी ठेवलेला व्हॉट्सॲप स्टेट्स सध्या चर्चेचा विषय ठरला असून ते आता आपला आसूड (हंटर) कोणावर चालवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Subscribe










