मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज कुडाळ येथील सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करत होता. महामार्गावर प्रवास करत असताना, सिंधुकेअर हॉस्पिटलच्या परिसरात रस्त्याच्या कडेला एक इनोव्हा गाडी उभी होती. दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किंवा वेगाचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीवर पाठीमागून जोरात आदळली. या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

error: Content is protected !!