कुडाळ मालवण या रस्त्याने अवजड वाहनांची विशेष करून परराज्यातील वाहन चालक हे बेदरकारपणे वाहने चालवत असतात. यावेळी, त्यांना थांबवून सामान्य लोकांनी जाब विचारल्यावर स्थानिक ग्रामस्थांना दादागिरीची भाषा तसेच उडवा-उडवीची उत्तरे देतात. हे सर्व चालक हे मध्य प्राशन केलेले असतात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत आपण आपल्या विभागामार्फत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
कोणताही व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही. सध्या चालू असलेला गौणखनिज व्यवसाय मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या केला जातो. पण, आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही. परंतू, सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये, ही आमची भूमिका आहे.
कुडाळ मालवण रस्त्यावर चिरे आणि वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी येणार्या गाड्या ह्या बहुतांशी परराज्यातून परजिल्ह्यातून येतात. एकाच वेळी दहा दहा गाड्या सलग रस्त्यावरून धावतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. अन्यथा, आम्हाला जनतेला घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. असा इशारा जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दिला आहे.
1
/
109
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
1
/
109


Subscribe









