कणकवली : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी, ज्यु. कॉलेज कनेडी व बालमंदिर कनेडी (English Medium) प्रशालेत वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर शालेय समितीचे चेअरमन श्री. आर.एच. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, बालमंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ग्रेसी चोडणेकर आदी मान्यवर उपस्थिती होते. त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन मुलांना केले.
या कार्यक्रमात बालमंदिरचे माजी विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यापैकी काही माजी विद्यार्थ्यांनी तसेच माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेचे माजी शिक्षक लोबो सर यांची कन्या फ्लोरा लोबो यांनी देणगी स्वरूपात प्रशालेला मदत केली. ही देणगीची संकल्पना शालेय समितीचे सदस्य श्री. नितीन सावंत यांनी मांडली. तसेच शालेय समितीचे सदस्य बावतीस घोन्सालवीस, शिक्षक पालक संघाचे सदस्य श्री.ओमप्रकाश ताम्हाणेकर, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन रुबी घोन्सालवीस मॅडम, चांदोस्कर मॅडम, डोंगमोडेकर मॅडम यांनी उत्तम नियोजन केले. सरते शेवटी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची माजी विद्यार्थीनी तेजस्विनी पांगम व निषाद सावंत याने कार्यक्रमाचे आभार मानले.


Subscribe










