आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते – प्रवीण तांबे

शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

कणकवली : आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार, निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.असे प्रतिपादन शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले.

ते शिरवल ग्रामपंचायत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली मार्फत उपकेंद्र शिरवल येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात बोलत होते.
“हिंद दी- चादर”श्री.गुरु तेज बहादूर साहेबजी ३५०‌वा शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त मोफत आरोग्य शिबिर तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी उपसरपंच प्रवीण तांबे बोलत होते.पुढे बोलताना तांबे म्हणाले की,कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शिरवल उपकेंद्राच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आणि ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणारा सेवाभावी उपक्रम आहे.

यावेळी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, डॉ.स्नेहल परब यांनी नियमित आरोग्य तपासणी, सकस आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी आरोग्य सहाय्यक,श्री गंगाधर पाटील ,श्रीमती दीप्ती मोंडकर स्टाफ नर्स (एनसीडी) आरोग्य सहाय्यक,एस.व्ही. जाधव ,आरोग्य सेवक डी.बी. सुर्वे,माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सावंत,आरोग्य सेविका ,श्रीमती रश्मी सोहनी, ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रिती सावंत आणि सौ.चैताली पांचाळ,डाटा ऑपरेटर राजेंद्र सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम उर्फ बाबू गुरव,आशा सेविका मेघना पांचाळ,मदतनीस अनिता घाडीगावकर , आदी उपस्थित होते.

या शिबिरात डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने शिबिरात आलेल्या लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि असंसर्गजन्य रोगांची (एनसीडी) तपासणी करुन उपचार देण्यात आले.तसेच आयुष्मान भारत कार्ड (पीएमजेवाय)कार्ड काढण्यात आले.लाभार्थ्यांची इसीजी तपासणी करुन जनजागृती करण्यात आली.यावेळी शिरवल गावातील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरासाठी शिरवल सरपंच सौ.गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे आणि ग्रामपंचायत शिरवल चे बहुमोल सहकार्य लाभले.

error: Content is protected !!