आज दिनांक १३/०२/२०२६ रोजी केंद्र पुरस्कृत पायलाग रोगाच्या प्रतीबंधक लसीकरणाची सुरुवात मौजे नेरूर तालुका कुडाळ येथे जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रुपेश पावसकर व पंचायत समिती सदस्य मा. श्रीमती दिप्ती नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सदर दिनी सरसोलीधाम येथील गोशाळेतील १४० पशुधनास लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून आज ४८ पशुधनास लसिकरण करण्यात आले. उपक्रमाच्या सुरुवातीस सन्मा. श्रीम. नाईक यांच्या कडून गोमातेची पूजा झाल्यावर सन्मा. श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लसिकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
डॉ. अभिजीत भगवान कसालकर सहाय्यक आयुक्त तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी कुडाळ यांनी उपस्थित पशुपालकांना पायलाग लसीकरणाचे महत्व तसेच पायलाग लसीच्या रोगाबाबतचे निर्मुलन याबाबतचे महत्व विषद केले. पायलाग लसिकरण केलेले पशुधन हे खात्याच्या संगणक प्रणालीवर नोंदविण्यात येणार असल्याने त्याबाबतची पध्दती व जनावरांच्या संगणक प्रणालीतील महत्व विषद केले.
मोहिम यशस्वी करण्याकरीता श्री.एस. पी. फणसेकर (प.वि.अ), श्रीम. धनश्री परब/शेडगे (प.प), श्रीम. समिरा केरकर (प.प.) तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय कुडाळ, तसेच श्री. सूचित खवणेकर (प.प) पशुवैद्यकीय चिकीत्सालय सरंबळ, श्री. सुभाष सज्जन (प.प) पशुवैद्यकीय चिकीत्सालय वालावल लसीकरणाच्या सर्वतोपरी साहित्य सामुग्रीसह उपस्थित राहून लसिकरण मोहीम यशस्वी करण्यास सहकार्य केले.


Subscribe






