गरिबांचे अश्रू पुसणारा नेता – आ. निलेश राणे

“कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच कोकण” हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. कोकणी माणूस जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा पाहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून राणे कुटुंबियांनाच हाक देतो. कारण ‘राणे’ हे फक्त नाव नसून तो ‘रामबाण’ उपाय आहे हे सर्वांना माहीत आहे. काल पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला.

वायरी भूतनाथ येथील मोहन राजाराम टेंबुलकर हे आजारी असल्यामुळे त्यांना मुंबई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराबाबत विचारणा केली असता रुग्णाच्या नातेवाईकांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. डॉक्टरांकडून उलट बिल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. डॉक्टरांच्या या वागण्यामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील हतबल झाले होते. अशा परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांना शेवटचा पर्याय म्हणून आमदार निलेश राणे यांचे नाव आठवले. नातेवाईकांनी ही गोष्ट आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली. काल कुडाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा असल्यामुळे आमदार निलेश राणे सभेच्या नियोजनामध्ये व्यस्त होते. अशा परिस्थितीत आमदार निलेश राणे यांनी वेळात वेळ काढून राणे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सांगून त्या रुग्णाला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवले. तसेच रुग्णाला लागेल ती मदत करण्याच्या सूचना राणे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना दिल्या. त्या रुग्णाची तब्येत पूर्वीपेक्षा बरी असून नातेवाईकांनी आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार मानले.

आजवर आमदार निलेश राणे यांनी अनेकांच्या मदतीला धावून जात त्यांना संकटातून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांचे नाव सर्वांच्या मनावर कायमचे कोरले गेले असून कालच्या घटनेमुळे “आमदार निलेश राणे म्हणजे गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता” अशी त्यांची ओळख बनली आहे.

error: Content is protected !!