कालेली गावातील ५० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

योगिता कानडे / कुडाळ

कुडाळ तालुक्यातील कालेली गावातील राजकीय समीकरणे आता बदलू लागली आहेत. विकासकामांचा धडाका आणि जनसंपर्क लक्षात घेता, कालेली गावातील सुमारे ५० कार्यकर्त्यांनी दत्ताजी सामंत यांच्या उपस्थितीत ‘भगवा’ हाती धरून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दत्ता सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या तरुणांनी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कालेली येथे आज क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी दत्ता सामंत यांनी सर्व नवीन सदस्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. “सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सोहळ्याला शिवसेनेचे दत्ताजी सामंत, दीपक नारकर , अरविंद करलकर, सद्गुरु घावनळकर, रामभाऊ धुरी, सचिन धुरी , राऊळ मॅडम, ग्रा.सदस्य परब मॅडम, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कालेली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!