भाजप ३१, तर शिवसेना १९ जागांवर लढणार!
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महायुतीचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला असून याबाबतची माहिती खासदार नारायण राणे यांच्याकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेसाठी भाजपला ३१ जागा देण्यात आल्या असून शिवसेनेला १९ जागा देण्यात आल्या आहेत. तर पंचायत समित्यांसाठी भाजपला ६३ जागा देण्यात आल्या असून शिवसेनेला ३७ जागा देण्यात आल्या आहेत.
सावंतवाडी
भाजप : जि.प. ११, प. स. १७
शिवसेना : जि.प. ६, प. स. १७
कुडाळ
भाजप : जि.प. ४, प. स. १५
शिवसेना : जि.प. ११, प. स. १५
कणकवली
भाजप : जि.प. १६, प. स. ३१
शिवसेना : जि.प. २, प. स. ५
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा ३ वर्षांसाठी भाजपकडे असेल तर २ वर्षांसाठी शिवसेनेला मिळणार आहे.
जागावाटपाच्या या आकड्यांवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे, विशेषतः खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. कणकवली मतदारसंघात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, तर कुडाळमध्ये शिवसेनेला जिल्हा परिषदेसाठी अधिक जागा सोडण्यात आल्या आहेत. सावंतवाडीमध्ये मात्र पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही पक्षांचे समान बलाबल पाहायला मिळणार आहे.
या जागावाटपामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, महायुतीचे कार्यकर्ते आता प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

Subscribe









