महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅड अग्रिकल्चर च्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी २ वाजता प्रभारी अध्यक्ष श्री रवींद्र मानगावे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेमध्ये महाराष्ट्र चेंबरचे सदस्य माजी अध्यक्ष ललित गांधी यांच्या सभासदत्व रद्द करून त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय राज्यभरातून आलेल्या माजी अध्यक्ष, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष व सदस्यांनी प्रचंड बहुमताने घेतला.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष प्रफुल मालानी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, उपाध्यक्ष रमाकांत मालू, उपाध्यक्ष शंकर शिंदे, उपाध्यक्ष संगीता पाटील उपस्थित होते.
दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी झालेली विशेष सर्वसाधारण सभा ही महाराष्ट्र चेंबरचे 98 वर्षाच्या इतिहासाला कलंक लावणारी होती या बैठकीत घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेतील गंभीर चुका, नियम भंग आणि फेरफार यामुळे संपूर्ण सभा गोंधळात जाऊन तहकूब करावी लागली होती. यावेळी सभासदांना दिलेल्या मसुद्यात मूळ घटनेशी विसंगत मजकूर, फेरफार केलेली मांडणी आणि नियमबाह्य कृती दिसून आली. नियमानुसार सात दिवस आधी मसुदा द्यायचा असताना तो केवळ तीन दिवस आधी दिला गेला. मजकुरातील शब्दांची जुळवाजुळव करून हेतू पुरस्सर गाँधळ निर्माण करण्यात आला. हि दुर्लक्षाची बाब नसून चैबरवर एक हाती ताबा मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच सर्वात गंभीर बाब म्हणजे व्यवस्थापन समितीला या संपूर्ण प्रक्रियेतून डावलण्यात आले आणि आपल्या अध्यक्षतेखाली मनमानी कारभार करून व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याशिवाय थेट विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मसुदा मांडण्यात आला. ही वागणूक केवळ सभासदांच्या नव्हे तर व्यवस्थापन समितीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी होती. अशा एक नव्हे अनेक चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे व्यवस्थापन समितीतील 1२ पैकी ९ व्यवस्थापन समिती सदस्यांनी पत्र लिहून ललित गांधी यांच्याकडे स्वइच्छेने राजीनामा देण्याची सूचना केली होती. तसेच घटनेतील तरतुदीनुसार संस्थेचा अध्यक्ष सलग चार वर्ष असल्यावर त्यांना परत अध्यक्ष होता येत नाही. ललित गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 31 मार्च 2025 ला संपला असताना 25-26 या वर्षासाठी सुद्धा त्यांची झालेली निवड अवैद्य होती.
व्यवस्थापन समिती, कार्यकारणी समिती आणि विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ललित गांधी यांचे वैयक्तिक व विविध संस्थांतर्फे करत असलेल्या प्रतिनिधित्वाचे सभासदत्व कायमस्वरूपी रद करण्याचा निर्णय प्रचंड बहुमताने घेण्यात आला.
यासह विविध बाबीवर सभेमध्ये चर्चा होऊन ललित गांधी यांचे वैयक्तिक व विविध संस्थांतर्फे करत असलेल्या प्रतिनिधित्वाचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा ठराव प्रचंड बहुमताने सभासदांनी मंजूर केला.
याप्रसंगी गेल्या चार वर्षात ललित गांधी यांनी केलेल्या मनमानी कारभार बाबत उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी अध्यक्ष अरविंद दोशी, विक्रम सारडा, हेमंत राठी, माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उमेश दशरथी, माजी उपाध्यक्ष अनिल गचके, माजी उपाध्यक्ष शुभांगी तीरोडकर, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, माजी उपाध्यक्ष तनसुख झांबड, संजय शेटे रमेश आरवाडे, आदिसह पदाधिकाऱ्यांसह राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागातील नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, संभाजीनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कुडाळ यासह विविध शहरातील महाराष्ट्र चेंबरचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Subscribe









