पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचा उदयोन्मुख चेहरा – रुपेश पिंगुळकर

कुडाळ : जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेकजण निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले तर काही ठिकाणी नव्या तरुण उमेदवारांना संधी मिळणार आहे. अशातच पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून एका तरुण उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी तालुकाप्रमुख रुपेश पिंगुळकर यांचे..

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून अनेक मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. अशातच नवा तरुण आश्वासक चेहरा म्हणून रुपेश पिंगुळकर यांच्याकडे पाहिले जात आहे. रुपेश पिंगुळकर हे पिंगुळी ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणासह नेतृत्वगुण देखील त्यांच्या अंगी आहेत.

आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायणराव राणे यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये ते नेहमी धाऊन जातात. त्यामुळे फार मोठा युवावर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघातून रुपेश पिंगुळकर हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

error: Content is protected !!