सावंतवाडीतील मोती तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आज रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मोती तलावात (Moti Talav) एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही व्यक्ती शहरातील सालईवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.

राजवाड्यासमोर असलेल्या मोती तलावाजवळ ही घटना घडल्यानंतर परिसरात तात्काळ नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तलावात उडी घेतलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचे कार्य त्वरित सुरू केले आहे.

पोलिसांकडून या घटनेबद्दल अधिक तपास सुरू असून, व्यक्तीच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

error: Content is protected !!