भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

आमदार नितेश राणे यांची देखील असणार उपस्थिती

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उपाध्यक्ष लखमराजे भोसले,सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्नील काळे पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुक व ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ हा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असून , सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट देणार आहेत. कणकवली प्रहार भवन हॉल मध्ये सकाळी 10 वाजता कार्यकर्ता संवाद होणार असल्याची माहिती मेस्त्री यांनी दिली.

error: Content is protected !!