रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना

सावंतवाडी : उदयभानू विजय सावळ (वय 35 राह. मळगाव, सावळवाडा) हे आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नेमळे ब्रिजच्या खाली रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत मयत स्थितीत पडलेले  आढळले. ते अविवाहित होते व त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु होते.
याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनास्थळी पीएसआय माधुरी मुळीक व स्टाफ पोहोचले असून पुढील कार्यवाही करीत आहेत.

error: Content is protected !!