शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले

बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ

उर्वरित 4 जणांचा शोध सुरू

सिंधुदुर्गनगरी : 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.

समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे

१. इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष 17 रा. लोंढा, बेळगाव (वाचली आहे)
२. श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
३. श्री इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत)
४. श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय 16, रा अल्लावर, बेळगाव (मयत)

बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे

१. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय 36 रा. लोंढा, बेळगाव
२. इक्वान इमरान कित्तूर, वय 15 रा. लोंढा, बेळगाव
३.फरहान मोहम्मद मणियार, वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
४ जाकीर निसार मणियार वय 13, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.

घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


error: Content is protected !!