कुडाळ शिवापूर येथे गौरी ओवसा पारंपरिक पद्धतीने साजरा

कुडाळ : शिवापूर गणेशोत्सवामध्ये अजून एक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तो म्हणजे ‘गौरी ओवसा.”विशेषतः कोकणात याची मोठी परंपरा आहे.

कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे ‘गौरी ओवसा” पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीदेव रवळनाथ देवतेला, आई सातेरी देवीला ओवसा देवून गौरी उत्सव साजरा केला. शिवापूर गाव्हाळवाडी येथे हा गौरी ओवसा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

यामध्ये विवाहित महिला एकत्र येऊन देवी गौरीला ओवाळतात आणि विविध प्रकारच्या वस्तू सुपात ठेवतात. हा सण स्त्रीच्या सुवासिनीत्वाचे, प्रजननक्षमतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानतात, असे म्हटले जाते.

error: Content is protected !!