कुडाळ : तालुक्यात तालुक्यातील पिंगुळी महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ भूपकर वाडीतील ५ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावेळी अनेकांचं डोळे भरून आले होते.
कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यातून बाप्पाच्या भेटीसाठी कोकणात दाखल होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे थाटामाटात आगमन होते. दीड, पाच, सात, अकरा दिवस बाप्पा पाहुणचार स्वीकारतो. या दिवसात बाप्पाचे एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड केले जातात. बाप्पा देखील आनंदाने सर्वांचे ते प्रेम स्वीकारतो. आणि वर्षभरासाठी सर्वांचा निरोप घेतो.
पिंगुळी भूपकर वाडीतील ५ दिवसांच्या बाप्पांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी परिसर दुमदुमून गेला होता. अखेर पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.