कुडाळ – मालवण रोडवरील ते बॅनर ठरतायत चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग : “आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून… रस्ता हरवला आहे…प्रशासन गाढ झोपलंय” अशा आशयाचे बॅनर कुडाळ – मालवण मार्गावर लागले आहेत. जे बॅनर सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
कुडाळ – मालवण मार्गावर अनेक ठिकाणी सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ज्यामुळे खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावरून वाहनाची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शिवाय सध्या गणेश चतुर्थीचा कालावधी असल्यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सध्या कोकणात उतरले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा वाहनांची वर्दळ जास्तच पाहायला मिळत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.
कुडाळ – मालवण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्यामुळे या मार्गाला चंद्राची उपमा या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एका प्रकारे उपरोधिक संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या बॅनरवर “आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून… रस्ता हरवला आहे…प्रशासन गाढ झोपलंय” असा मजकूर छापण्यात आला आहे. जो सध्या प्रशासनाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालण्याचे काम करत आहे.


Subscribe








