खा.नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
कणकवली प्रतिनिधी: काल विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान ह्या आधीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी राणे व मुख्यमंत्र्यांमध्ये भेट होणार आहे. काल झलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे.