रोहा प्रतिनिधी: कोकण निसर्गाने नटलेलं आणि विविधतेचा साज अंगावर पांघरलेलं नंदनवन. इथे निसर्गाच्या किमायेची अनेक उदाहरण पाहायला मिळतात.ऐकायला मिळतात.असाच एक काहीसा नवल करणारा प्राणी रोहा येथील कुंडलिका नदीवरीलरोहा अष्टमी पुलानजीक बुधवारी सायंकाळी अढळला. या प्राण्याला चार शेपटी व एक शीर आहे अशी माहिती जवळच्या भागात वाऱ्यासारखी पसरली.
या प्राण्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.याबाबत वन्यजीव रक्षक सागर दाहिंबेकर यांनी सांगितले की या वेळेस सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड संस्थेतील सदस्य त्या मार्गावरून जात होते. गर्दी पाहून ते देखील थांबले व घटनेची संपूर्ण माहिती घेतली तो जीव नेमका काय आहे हे पाहण्यासाठी जवळच असलेल्या एका होडीच्या साह्याने त्या अनोळखी जीवा जवळ पोहोचले.त्या ठिकाणी गेल्यानंतर असे निदर्शनात आले की एका मासे पकडणाऱ्या जाळ्यामध्ये तब्बल तीन मरीन फाइ स्नेक (file snake) अडकले आहेत. त्यापैकी दोन स मृत्यू झाला होता तर एक साप जिवंत होता त्या सापांना बाहेर काढल्यानंतर त्यातील तिसऱ्या सापाचा देखील मृत्यू झाला.